Smart TV Buying Guide: घराच्या लिविंग रूमध्ये टीव्ही हा एखाद्या शोभेच्या वस्तूसारखा झाला आहे. यामुळे अनेक लोक टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असतील तर बाजारात उपलब्ध असलेल्या ऑप्शन्समुळे कन्फ्युजन निर्माण होते. पण आज आपण अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊयात ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरतील आणि तुम्हाला बेस्ट स्मार्ट-टीव्ही डिवाइसची निवड करण्यास मदत करेल.
मोबाईलच्या या जमान्यात लोक टीव्हीचा वापर कमी करत असले तरी त्यामुळे आपल्या घराच्या सजावटीत भर पडते हे देखील तितकेच खरे आहे. मनोरंजन प्रदान करण्याव्यतिरिक्त, टीव्ही तुमच्या लिव्हिंग रूमला सर्वोत्तम दिसण्यात देखील मदत करतात. गेल्या काही वर्षांत, स्मार्ट टीव्हीने बाजारपेठेवर वर्चस्व गाजवले आहे आणि त्यामुळे बहुतेक लोक स्मार्ट-टीव्ही ऑपशन्स कडे वळले आहेत. म्हणूनच तुम्ही देखील नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर पाहूया कोणत्या फिचर्सकडे विशेष लक्ष द्यावे.
ब्रँड आणि बजेट:
जर तुम्हाला चांगला टीव्ही हवा असेल तर योग्य ब्रँड निवडणे महत्त्वाचे आहे. अनेक ब्रँड्समधून तुमच्या गरजेनुसार योग्य टीव्हीची निवड तुम्ही करू शकता. स्क्रीन साईज, टेक्नॉलॉजी आणि फिचर्स यासारख्या घटकांवर अवलंबून असल्यामुळे स्मार्ट टीव्हीच्या किमती यानुसार बदलतात.
बाजारात उपलब्ध असलेले टीव्हीचे मॉडेल्स:
LED – स्मार्ट टीव्हीमध्ये या टेक्नॉलॉजीचा सर्वाधिक वापर केला जातो. या गोष्टीचं कारण म्हणजे उत्तम कॉन्ट्रास्ट लेव्हलमुळे चांगली पिक्चर क्वालिटी मिळते.
OLED – ही टेक्नॉलॉजी आपल्या कलर्स प्रेझेंटेशनसाठी ओळखली जाते.
QLED – या टीव्ही मध्ये वापरण्यात आलेली टेक्नॉलॉजी सर्वोत्तम मानली जाते आणि यात LED आणि OLED पेक्षा चांगले कॉन्ट्रास्ट मिळतो.
स्क्रीन साईज:
टीव्ही बाजारात अनेक स्क्रीन साइजेसमध्ये उपलब्ध असतो, परंतु त्याचा योग्य साईज निश्चित करण्यासाठी, तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
आयडियल स्क्रीनचा आकार तुमच्या पाहण्याचे अंतर आणि खोलीच्या आकारावर अवलंबून असतो. छोट्या खोल्यांसाठी, ३२-४३-इंच ते ५५-इंच टीव्ही पुरेसा आहे, तर मोठ्या जागेत ६५-इंच किंवा ७५-इंच टीव्ही बसू शकतो. चला तर मग पाहुयात ३२ इंच स्क्रीन साईझ आकाराचे आकर्षक टीव्ही.
स्मार्ट टीव्हीचे फिचर्स आणि ऑपरेटिंग सिस्टम:
स्मार्ट टीव्हीला स्मार्ट म्हटले जाते कारण त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे स्मार्ट फिचर्स असतात, ज्यामुळे ते सामान्य टीव्हीपेक्षा वेगळे ठरतात. टीव्ही निवडताना, लक्षात ठेवा की त्यामध्ये सर्व ॲप्सची उपलब्धता आणि स्मार्ट होम डिव्हाइसेसशी compatibility असावी. यामध्ये Android TV, webOS आणि Roku TV सारख्या लोकप्रिय ऑप्शन्स समावेश आहे.
साऊंड क्वालिटी:
बहुतेक लोक इमर्सिव्ह ऑडिओ अनुभवासाठी एकस्टर्नल साऊंड सिस्टिमवर अवलंबून असतात, तसेच तुम्हाला टीव्हीचा ऑडिओ उत्तम हवा असेल तर, इनबिल्ट स्पीकर असलेले डिव्हाइस घेण्याचा विचार करा. याशिवाय, अधिक सिनेमॅटिक साउंडसाठी, तुम्ही डॉल्बी ॲटमॉस सारख्या फिचर्ससह टीव्ही खरेदी करू शकता. स्मार्ट टीव्ही अनेकदा व्हॉइस कंट्रोल्स, व्हिडिओ कॉलसाठी इनबिल्ट कॅमेरे आणि मोशन कंट्रोल्ससह येतात. याचीही विशेष काळजी घ्या.
कनेक्टिव्हिटी आणि पोर्ट:
स्ट्रीमिंग स्टिक, गेमिंग कन्सोल आणि केबल बॉक्स यासारखी डिवाइस कनेक्ट करण्यासाठी स्मार्ट टीव्हीमध्ये पुरेसे HDMI पोर्ट आहेत कि नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. यासोबतच स्टोरेज डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी USB सारखे पोर्ट आणि साउंडबार कनेक्ट करण्यासाठी ऑप्टिकल ऑडिओ आउटपुट देखील आवश्यक आहेत. जर तुम्हाला स्ट्रीमिंग सेवा आणि इंटरनेटचा आनंद घ्यायचा असेल तर टीव्हीमध्ये वाय-फाय कनेक्टिव्हिटी देखील असणे गरजेचं.