SAMSUNG | Galaxy Buds 3, Galaxy Buds 3 Pro Earbuds with AI
HIGHLIGHTS
Samsung Galaxy Unpacked Event मध्ये Samsung Galaxy Buds 3 आणि Galaxy Buds 3 Pro लाँच
Samsung च्या या दोन्ही बडमध्ये Active Noise Cancellation (ANC) देण्यात आले आहे.
Galaxy Buds 3 Series इंटरप्रिटर आणि व्हॉइस कमांडसह AI फीचर्ससह येतो.
Samsung Galaxy Buds 3, Buds 3 Pro with AI : बुधवारी 10 जुलै रोजी पार पडलेल्या पॅरिसमधील Samsung Galaxy Unpacked Event मध्ये Samsung Galaxy Buds 3 आणि Galaxy Buds 3 Pro लाँच करण्यात आले. हे जबरदस्त Earbuds अनेक अप्रतिम AI फीचर्ससह सादर करण्यात आले आहेत. Samsung च्या या दोन्ही Earbuds Active Noise Cancellation (ANC) देण्यात आले आहे. याशिवाय याला वॉटर रेझिस्टंटसाठी (Water Resistance) IP57 रेटिंग मिळाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Samsung Galaxy Buds 3 आणि Galaxy Buds 3 Pro ची किंमत आणि सर्व माहिती-
Samsung Galaxy Buds 3, Galaxy Buds 3 Pro ची किंमत
Samsung Galaxy Buds 3, Buds 3 Pro with AI :
लेटेस्ट Samsung Galaxy Buds 3 ची भारतात सुरुवातीची Buds 3 ची किंमत 14,999 रुपये आहे आणि Buds 3 Pro ची किंमत 19,999 रुपये आहे.
दोन्ही बड्सचे प्री-ऑर्डर सुरू झाले आहे. हे बड्स 24 जुलैपासून खरेदीसाठी उपलब्ध होतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे दोन्ही बाँड्स सिल्वर आणि व्हाईट कलर ऑप्शन्समध्ये सादर केले गेले आहेत.
Samsung Galaxy Buds 3 सिरीज with AI फीचर्स
Samsung Galaxy Buds 3, Buds 3 Pro with AI : Galaxy Buds 3 सिरीज इंटरप्रिटर आणि व्हॉइस कमांड, AI फीचर्ससह येतो. इंटरप्रिटर मोड कोणतीही भाषा ऐकू शकतो आणि रिअल टाइममध्ये ती तुमच्या भाषेत भाषांतरित म्हणजेच Translate करू शकतो. त्याचप्रमाणे आवाज नियंत्रित करणे आणि व्हॉइस कमांडद्वारे म्युझिक प्ले-पॉज करणे असे अत्भुत Features यात Available आहेत.
SAMSUNG | Galaxy Buds 3, Galaxy Buds 3 Pro Earbuds with AI
Samsung Galaxy Buds 3, Galaxy Buds 3 Pro चे तपशील
Samsung Galaxy Buds 3, Buds 3 Pro with AI : Samsung Galaxy Buds 3 सिरीज नवीन डिझाइनसह लॉन्च करण्यात आली आहे. Galaxy Buds 3 ओपन टाईप डिझाईनसह येतात. तर, प्रो मॉडेल इन-इयर टाईप डिझाइनसह येतो. Galaxy Buds 3 Pro मध्ये ॲम्बियंट साउंड मोड (ambient sounds mod) आणि व्हॉईस डिटेक्ट (voice detector) फिचर आहे, जो आवाज आणि मानवी आवाज सहजपणे ओळखू शकतो. Galaxy Buds 3 11mm वन-वे डायनॅमिक ड्रायव्हरसह येतो. तर, Galaxy Buds 3 Pro टू-वे 10.5mm डायनॅमिक स्पीकर आणि 6.1mm प्लॅनरसह येतो. दोन्ही मॉडेल्समध्ये तीन मायक्रोफोन उपलब्ध आहेत. वॉटर रेसिस्टंससाठी या दोघांना IP55 रेटिंग मिळाले आहे.
Galaxy Buds 3 मध्ये 48mAh बॅटरी आहे आणि चार्जिंग केस 515mAh बॅटरीसह उपलब्ध आहे . बॅकअपसाठी यात 5 तासांचा आणि चार्जिंग केससह 30 तासांच्या बॅकअपचा दावा केला गेलेला आहे. Galaxy Buds 3 Pro मध्ये 53mAh बॅटरी आहे आणि चार्जिंग केसमध्ये 515mAh बॅटरी आहे. Galaxy Buds 3 सिरीजमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी, ब्लूटूथ 5.4 AAC, SBC, SSC, HiFi आणि SSC UHQ कोडेकच्या Support उपलब्ध आहे. Buds मध्ये ऑटो स्विचचा पर्याय देखील देण्यात आला आहे या फीचरच्या साहाय्याने तुम्ही दोन उपकरणांमध्ये स्विच करू शकता.
Samsung Galaxy Buds 3, Buds 3 Pro with AI | Specifications:
Variant | Galaxy Buds 3 | Galaxy Buds 3 Pro |
Price | Rs. 14,999 | Rs. 19,999 |
Colors | White, Silver | White, Silver |
Durability | IP57 | IP57 |
Galaxy AI | Interpreter, Adaptive EQ/ANC | Interpreter, Adaptive EQ/ANC, Adaptive Noise Control, Siren Detect/Voice Detect |
Dimensions | 31.9 x 20.4 x 18.1 mm | 33.2 x 19.8 x 18.1 mm |
Weight (per bud) | 4.7 g | 5.4 g |
Battery life | 5 hours, 24 with case (ANC on) | 6 hours, 26 with case (ANC on) |
Connectivity | Bluetooth 5.4 | Bluetooth 5.4 |