Xiaomi चा धमाकेदार Powerful टॅबलेट Redmi Pad Pro 5G, 29 जुलै रोजी भारतात येतोय!

Redmi Pad Pro 5G
MI | Redmi Pad Pro 5G

HIGHLIGHTS

Redmi चा नवा Tablet Redmi Pad Pro 5G च्या भारतीय लाँचची घोषणा. 

Redmi ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत दिली माहिती. 

Redmi नवा टॅबलेट या महिन्याच्या शेवटी भारतीय बाजारात लाँच होणार आहे.

Xiaomi येत्या काही दिवसात नवीन प्रोडक्ट भारतात लाँच करणार आहे. होय, Redmi चा नवा Tablet Redmi Pad Pro 5G च्या भारतीय लाँचची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने confirm केली आहे की, नवा Tablet या महिन्याच्या शेवटी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. कंपनीने जागतिक बाजारपेठेत या Tablet च्या फीचर्सची उघड केली आहेत. या Tablet मध्ये मोठी Screen, Powerful Processor आणि अनेक चांगले फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत. जाणून घेऊयात Redmi Pad Pro 5G चे भारतीय लॉन्चिंगचे details –

Redmi Pad Pro 5G
MI | Redmi Pad Pro 5G

Redmi Pad Pro 5G चे भारतीय लॉन्चिंग

Redmi ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत, Redmi Pad Pro 5G च्या भारतीय लाँच date बद्दल खुलासा केला आहे. हा नवा टॅबलेट जुलै महिन्याच्या शेवटी म्हणजेच 29 जुलै रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. तुम्ही खालील पोस्टमध्ये Tablet बद्दलची माहिती बघू शकता.

Redmi Pad Pro 5G चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

Redmi Pad Pro 5G मध्ये 12.1-इंच लांबीचा Display देण्यात आला आहे, जो 120Hz AdaptiveSync रिफ्रेश रेटसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Snapdragon 7s Gen 2 चिपसेट Processor वापरण्यात आलेत आहे. यासोबतच, स्टोरेज सेक्शनमध्ये यात 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिले जाईल. ताज्या माहितीनुसार, या टॅबलेटमध्ये 1.5TB पर्यंतचे मायक्रो SD कार्ड इन्स्टॉल केले जाऊ शकते.

फोटोग्राफीसाठी, 8MP रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये फक्त 8MP फ्रंट कॅमेरा दिला जाईल. या टॅबलेटमध्ये 10,000mAh बॅटरी आणि 33W वायर चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. बॅटरी बॅकअपबद्दल, कंपनीचा दावा आहे की, ते एका पूर्ण चार्जवर 12 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक टाइम प्रदान करेल. लक्षात घ्या की, भारतात लाँच होणाऱ्या टॅबलेटचे फीचर्स ग्लोबल व्हेरियंटसारखे असतील की, ते बदलले जातील याची कंपनीने अद्याप पुष्टी केलेली नाही.

Redmi Pad Pro 5G स्पेसिफिकेशन

FeaturesDetails
डिस्प्ले12.1 इंच, 120Hz रिफ्रेश रेट
प्रोसेसरQualcomm Snapdragon 7s Gen 2
स्टाइलस सपोर्टउपलब्ध
बॅटरी10,000mAh
व्हिडिओ प्लेबॅक12 तासांपर्यंत
ऑपरेटिंग सिस्टीमXiaomi HyperOS
व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटणउजव्या बाजूला
सिम-ट्रेडाव्या काठावर
कनेक्टिव्हिटी5G

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *